डॉ. दीपक म्हैसेकर यांची मुख्यमंत्र्याच्या सल्लागारपदी निवड; 'ही' विशेष जबाबदारी पार पाडणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

डॉ. म्हैसेकर यांनी पुण्यात विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे.

पुणे : पुण्याचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या निर्णयाची शुक्रवारी (ता.४) घोषणा केली. मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम करणारे असले तरी त्यांचे कार्यालय पुण्यात राहणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या नियंत्रणाखाली डॉ. म्हैसेकर काम करणार आहेत. 

पत्रकार रायकरांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी​

डॉ. म्हैसेकर यांनी पुण्यात विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. कोणत्याही विषयावर परिस्थितीचे विश्लेषण करून मुख्यमंत्री ठाकरे यांना योग्य तो सल्ला देण्याची जबाबदारी डॉ. म्हैसेकर यांच्यावर राहणार आहे. 

पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉ. म्हैसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती आणि त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

तुम्हाला माहित आहे का? एकमेकांच्या संमतीने दररोज ५ जोडपी घेताहेत घटस्फोट!​

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. पुण्यासह राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासह इतर अनुषंगिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडू.
- डॉ. दीपक म्हैसेकर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Deepak Mhaisekar selected as Advisor to CM Uddhav Thackeray