कोरोनाबरोबर जगण्यासाठी नव्या जीवनशैलीचा कानमंत्र 

dr deepak mhaisekar
dr deepak mhaisekar
  • असा करा मास्कचा वापर 
  • चेहऱ्यावरचे आवरण (मास्क) हा आता बदलत्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे हे स्वीकारावे लागेल. 
  • कापडी मास्क वापरत असेल तर प्रती व्यक्ती किमान ३ मास्क ठेवण्यात यावेत. घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावावा व एक राखीव मास्क ठेवावा. काही कारणामुळे वापरत असलेला मास्क वापर अयोग्य झाल्यास राखीव मास्कचा वापर करता येईल. 
  • दिवसभर वापरलेला मास्क संध्याकाळी उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या फेसयुक्त पाण्यात बुडवून ठेवून नंतर स्वच्छ धुवून उन्हात वाळवून दुसऱ्या दिवशी वापरावा. 
  • शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या तिनपदरी मास्करचा पुर्नवापर करता येत नाही, तो योग्य पद्धतीने नष्ट करण्यात यावा. हा मास्क वापरताना घड्या सरळ कराव्यात. वरची पट्टी डोक्‍यावर व खालची पट्टी मानेच्या मागे असावी. 
  • N-९५ किंवा तत्सम मास्क वापरल्यास हा मास्क ५ ते ६ दिवसानंतर पुन्हा वापरता येऊ शकतो. त्यासाठी किमान ७ ते ८ मास्क असावेत. वापरलेला मास्क वेगळ्या प्लास्टिक डब्यामध्ये बंद करून ठेवावे. त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो, परंतु तो कोरडा असला पाहिजे. 

भारतात कोरोनाचा शिरकाव जानेवारी २०२० मध्ये झाला व महाराष्ट्रात मार्च २०२० मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसायला लागला. आता हे स्पष्ट झाले आहे की, या रोगावर लस उपलब्ध होईपर्यंत किंवा एखादी खात्रीलायक औषधपद्धती उपलब्ध होईपर्यंत या व्याधीबरोबर जगणे क्रमप्राप्त आहे. या रोगाची संक्रमणपद्धती लक्षात घेता जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील. 
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे. 

  • कार्यालयात काम सुरू करताना 
  • दैनंदिन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी आपले हात साबण व पाण्याने किमान २० सेकंद स्वच्छ धुवावे. यानंतरच हातमोज्यांचा उपयोग करावा. हातमोजे घातल्यानंतर चेहरा, डोळे, नाक, तोंड यास स्पर्श करू नये. हातमोजे खिशात घालण्याचे टाळावे. 
  • जेथे सॅनिटायझर उपलब्ध असेल तेथे किमान ७ मिलीलिटर सॅनिटायझर हातावर घेऊन दोन्ही तळहातांना मागेपुढे लावावे. सॅनिटायझर किमान ६० टक्के अल्कोहोल असणारे असावे. 
  • कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था अशा पद्धतीने करण्यात यावी की कर्मचाऱ्यांची तोंडे समोरासमोर येणार नाहीत. फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवण्यात यावे, शक्‍यतो बैठका टाळण्यात याव्यात व घ्यावयाच्या असल्यास त्यामध्ये भौतिक दुरावा ठेवण्यात यावा व कमीत कमी लोकांबरोबर अशा बैठका घेण्यात याव्यात किंवा व्हर्च्युअल मिटिंग्ज घेण्यात याव्यात. 
  • ज्या वस्तूंना वारंवार हाताने स्पर्श होण्याचा संभव आहे, अशा गोष्टींना (दरवाज्याचे हॅन्डल, पाण्याचे नळ इत्यादी) दोन ते तीन तासाने एक टक्का प्रमाणात सोडीयम हायपोक्‍लोराईड द्रावणाने स्वच्छ करावे. 
  • एकत्रित जास्त संख्येने काम करण्याची वेळ आल्यास छोटे छोटे समूह करण्यात यावेत, जेणेकरून जंतुसंसर्ग झाल्यास फक्त त्या समूहातील व्यक्तींचे विलगीकरण करता येईल व दैनंदिन कामकाजावर परिणाम टाळता येईल. 
  • कार्यालयातील बसावयाच्या जागी वेळोवेळी १ % हायपोक्‍लोराईड सोल्यूशनने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. 
  • भ्रमणध्वनीवर शक्‍यतो स्पिकरफोनचा वापर करावा. इतर व्यक्तींचा मोबाईल, पेन, हातरुमाल इत्यादी वस्तूंचा स्पर्श टाळावा. 
  • कार्यालयातील शौचालयांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. कार्यालयात आंघोळीची सुविधा उपलब्ध नसल्यास घरी गेल्यावर लगेच साबण व स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी. 
  • कर्मचाऱ्यांनी भोजनाची सुट्टी एकदाच घेऊ नये किंवा किमान ८ ते १० फुटांचे अंतर ठेवावे किंवा अशा पद्धतीने बसावे की, ज्यायोगे त्यांची तोंडे परस्परांच्या विरुद्ध दिशेला राहतील. म्हणजेच, भिंतीच्या बाजूला तोंड करून भोजन घ्यावे कारण भोजनाच्या वेळेस सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावरील मास्क काढलेला असल्याने संक्रमणाची शक्‍यता वाढते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • प्रवासादरम्यान काळजी घ्या 
  • फिजिकल डिस्टंन्सिंग, म्हणजेच इतर व्यक्तींपासून ६ फूट अंतर ठेवणे. 
  • वाहनातील धातूच्या भागांना (हॅन्डल, सीटच्या मागच्या बाजूचे धातूचे बार) व इतर पृष्ठभागांना स्पर्श टाळणे. 
  • प्रत्येक फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे. 
  • वाहनामध्ये विनामास्क प्रवेशास प्रतिबंध करावा. कार्यालयातील प्रवेशद्वारावर थर्मोस्कॅनर वापरावे. साबण व पाण्याचे हात स्वच्छ धुवावे. 
  • गणवेशाबरोबरच मास्क, हातमोजे व आवश्‍यकतेनुसार ×प्रन परिधान करावा. 
  • कामकाजाच्या ठिकाणी साबण, पाणी व हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध असावेत. 

वाचकहो, तुमच्या काही शंका, सूचना असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर व्हॉटस्अप करा. 9130088459
Mail : editor@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com