डॉ. हराळकर प्रकरणाची चौकशी

डॉ. हराळकर प्रकरणाची चौकशी
Published on

डॉ. हराळकरांसह २२ कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण
आठ दिवसात अहवाल आयुक्तांकडे करणार सादर

कर्मचाऱ्यांचे मानसिक छळ प्रकरण

सोलापूर, ता. २४ : तत्कालीन क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना मानसिक छळ करत असल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. याप्रकरणी डॉ. हराळकरांची चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीमध्ये मंगळवारी डॉ. हराळकरांसह २२ कर्मचाऱ्यांची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.
शहर क्षयरोग केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्याकडून सततच्या मानसिक त्रास, धमक्या आणि अपमानास्पद वर्तनामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होत असल्याची तक्रार केली होती. नंतर आरेाग्य कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत डॉ. हराळकरांच्या विरोधात महापालिकेसमोर ठिय्या मांडला. या प्रकरणी आयुक्त डॉ. सचिन आयुक्त यांनी डॉ. हराळकर यांची तातडीने बदली केली. तर अनुषंगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आणि आरोग्याधिकारी डॉ. राखी माने या दोघांची चौकशी समिती नियुक्त केले. समितीने मंगळवारी डॉ. हराळकर यांच्यासह २२ कर्मचारी असे २३ जणांची चौकशी केली. तर आठवडाभरात आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com