Dr. Jayant Narlikar: वडिलांचे स्वप्न साकारणार; डॉ. लीलावती नारळीकर यांची भावना
Student Empowerment: दिवंगत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना ‘विज्ञानमहर्षी पुरस्कार’ मरणोत्तर देण्यात आला. त्यांच्या कन्या डॉ. लीलावती नारळीकर यांनी डॉ. नारळीकर यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पुणे : ‘‘दिवंगत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांचे लोकांशी सहज जोडणे हे खूप खास होते.