अमोल कोल्हे म्हणतात, अजितदादांची सौंदर्यदृष्टी चकीत करणारी... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

अजित पवार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत.

पुणे : अजितदादांचा स्पष्टवक्तपणा, त्यांचा वक्तशीरपणा, त्यांच्या कामाचा झपाटा, त्यांचा जनसंपर्क आणि कोणत्याही कामातील सौंदर्यदृष्टी या गोष्टी भल्याभल्यांना चकीत करणाऱ्या आहेत. ते सर्वसामान्य कार्यकर्त्याची काळजी घेणारा एक जबाबदार कुटुंबप्रमुख आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण हिताचा विचार करणारा धडाडीचा नेता आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा ते जिता जागता पहाड आहेत, अशा शब्दांत खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.  

 

अजितदादा म्हणजे विश्वास, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागे पहाडा सारखा उभा राहणारा जिताजागता पहाड म्हणजे अजितदादा...
दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आई जगदंब आपणांस उदंड निरोगी आयुष्य देवो हिच प्रार्थना हीच सदिच्छा.!
जय शिवराय!@AjitPawarSpeaks #HBDAjitDada pic.twitter.com/wGxXYGdDzC

अजित पवार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनीही सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यानंतर शिवस्वराज्य यात्रेवेळी अजित पवार व अमोल कोल्हे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यावेळेचे अनुभव सांगताना कोल्हे म्हणाले, शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजितदादांना खूप जवळून पाहता आलं, अनुभवात आलं. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्याची काळजी घेणारा एक जबाबदार कुटुंबप्रमुख आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण हिताचा विचार करणारा धडाडीचा नेता म्हणून मला त्यांना पाहतं आलं. अजितदादा म्हणजे विश्वास आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा जिता जागता पहाड आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अजितदादांचे निर्णय नेहमीच...

वैयक्तीक अडचण असो किंवा कोणताही सामाजिक प्रश्न, माझ्यासाठी हक्काने मत मांडण्याची, व्यक्त होण्याची जागा म्हणजे अजितदादा पवार आहेत. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा देशाच्या सर्वौच्च संसदेत पोचला, हे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाबरोबरच अजितदादांचा वाटा सिंहाचा आहे. अजितदादा माध्यमांशी अघळपघळ बोलताना कधी दिसत नाही. कदाचित दादा कधी बातमीच्या मागे नसतात, पण बातमी मात्र दादांच्या प्रत्येक बोलण्यात आणि कृतीत असते. हे त्याचे द्योतक असावे. काम बोलले पाहिजे, हा दादांचा दंडक आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणाराच, हा महाराष्ट्राती प्रत्येक आणि प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण झालेला विश्वास आहे. सातत्याने इतकी वर्षे समाजकारणात असताना एका नेत्याविषयी हा विश्वास निर्माण होणे, ही नक्कीच असाधारण अशी गोष्ट आहे. 
 - डाॅ. अमोल कोल्हे, खासदार    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Kolhe wishes Ajit Pawar on his birthday