

साताऱ्यात डॉ. महाजन हॉस्पिटलचे उद्घाटन
सातारा, ता. १० : येथील जगदंब चौकातील मोनार्क हॉटेलजवळ उभारण्यात आलेल्या डॉ. महाजन हॉस्पिटलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. सातारा शहर व परिसरातील नागरिकांना अद्ययावत, विश्वासार्ह व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाजन कुटुंबीयांनी या अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली आहे.
डॉ. अभिषेक महाजन हे ऑर्थोपेडिक व ट्रॉमा विभागाचे प्रमुख असून, डॉ. सुरेश महाजन व डॉ. आदित्य महाजन हे त्वचारोग, कॉस्मेटोलॉजी, ट्रायकॉलॉजी व लेझर विभाग सांभाळणार आहेत. डॉ. मुग्धा महाजन या भूलतज्ज्ञ असून, आयसीयू व अॅनेस्थेशिया विभागाच्या प्रमुख आहेत. डॉ. तन्वी महाजन या पॅथॉलॉजी, बॅक्टेरियॉलॉजी व बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख आहेत, तर नीना महाजन फार्मसी विभाग पाहणार आहेत.
कार्यक्रमासाठी स्मिता देसाई, डॉ. प्रिया शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी आमदार मदन भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेविका मुक्ता लेवे, नगरसेवक सुशांत महाजन, शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू अशोकराव भोईटे, रमणलाल शाह, सुनील काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------------
25965
सातारा : येथे डॉ. महाजन हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, डॉ. सुरेश, डॉ. अभिषेक, डॉ. आदित्य व महाजन कुटुंबीय.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.