
खराडी - भारताच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे. देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही. तर सेवेतून नागरिकांना विकास सक्षम बनवायला हवे. अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.