esakal | Video: डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

dr narendra dabholkar after 7 years protest andhashraddha nirmoolan samitidr narendra dabholkar after 7 years protest andhashraddha nirmoolan samiti

सीबीआयच्या तपासाबाबत डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्येला सात वर्षे झाल्यानंतरही सीबीआयचा या गुन्ह्याबाबत तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. 

Video: डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अंनिसकडून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 'जबाब दो' आंदोलन करण्यात आले. विवेकाचा आवाज बुलंद होवो, अशी घोषणाबाजी करत 'लढेंगे और जितेंगे' असा विश्वास व्यक्त करण्यात आला. "मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?" असा सवाल सहभागींनी उपस्थित केला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही!
दरम्यान, सीबीआयच्या तपासाबाबत डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हत्येला सात वर्षे झाल्यानंतरही सीबीआयचा या गुन्ह्याबाबत तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. हत्येमागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, असे मत मुक्ता दाभोलकर व डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला आहे. 

आणखी वाचा - आजपासून पुण्यातून सुरू झाली एसटी सेवा

अंनिसचे काम जोमाने!
डॉ. दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.  कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत. तसेच, दोन समान शस्त्रे चारही गुन्ह्यांमध्ये वापरलेली आहेत. या प्रकरणी  सीबीआयने काही आरोपींना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात या केवळ खुनाच्या  घटना नसून हे दहशतवादी कृत्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर युएपीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकी समाजनिर्मितीचे काम त्यांच्या हत्येनंतरही जोमाने सुरु आहे. 'अंनिस'चे कार्यकर्ते व इतर समविचारी नागरीक हे काम निष्ठेने पुढे नेत आहेत. जटा निर्मूलन, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या निर्मितीचा लढा, जात पंचायतीच्या मनमानी विरोधातील आंदोलन, विवेकवाहिनी अशा अनेक अंगांनी हे काम विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top