पुणे - ‘स्त्रियांच्या आयुष्यात वैयक्तिक जीवनात किंवा सामूहिक प्रयत्नांतून झालेले बदल, १९९० ते २०२५ या कालावधीत स्त्रियांच्या आयुष्यातील बदलांची नोंद घेण्याचा प्रयत्न ‘दाही दिशा’ पुस्तकातून केला आहे. स्त्रियांच्या आंदोलनाचे प्रतिबिंब या कालखंडात कसे उमटले आहे, हेही यात मांडण्याचा प्रयत्न आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आत्मचरित्र लिहिण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.