पुणे - ससून रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नितीन नागनाथ अभिवंत (वय-४२, मूळ गाव देवडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचे हिमालयातील बुरान व्हॅली येथे ट्रेकिंगदरम्यान श्वासोच्छवासात अडथळा आल्याने सोमवारी (ता. ९) निधन झाले. ते शनिवारी (ता. ७) मुंबई येथून महाविद्यालयीन मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह ससून रुग्णालयातील त्यांच्या सहकारी, कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.