डॉ. प्रमोद चौधरी ठरले जैव अर्थव्यवस्थेतील जीवनगौरव पुरस्काराचे पहिले आशियायी मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रमोद चौधरी
डॉ. प्रमोद चौधरी ठरले जैव अर्थव्यवस्थेतील जीवनगौरव पुरस्काराचे पहिले आशियायी मानकरी

डॉ. प्रमोद चौधरी ठरले जैव अर्थव्यवस्थेतील जीवनगौरव पुरस्काराचे पहिले आशियायी मानकरी

पुणे: प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना २०२२ चा प्रतिष्ठित विल्यम सी. होल्मबर्ग जैवअर्थशास्त्रातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले आशियायी व्यक्ती आहेत. विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार जगभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांच्या जैव अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो.अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे १७ मार्चला‘ॲडव्हान्स बायोइकॉनॉमी लीडरशिप कॉन्फरन्स २०२२’ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

हेही वाचा: राहुल असेपर्यंत कॉंग्रेसचाही ‘राहु काळ'; अर्थमंत्री सीतारामन भडकल्या

या पुरस्काराची घोषणा करताना, बायोफ्यूल्स डायजेस्टचे संस्थापक आणि संपादक जिम लेन म्हणाले, ‘‘शून्य कार्बन सिव्हिलायझेशनचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी तसेच जागतिक प्रगत जैव अर्थव्यवस्थेतील त्यांच्या स्थिर नेतृत्वासाठी डॉ. प्रमोद चौधरी यांची पॅनेलने एकमताने निवड केली आहे. ’’

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गेल्या चार दशकांपासून ‘प्राज’च्या टीमच्या प्रयत्नांचा दाखला म्हणून मी या पुरस्काराकडे पाहतो. जैव अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ऊर्जा संक्रमणामध्ये भारताच्या क्षमतेची जग योग्य दखल घेत आहे, याचा आनंद आहे.’’

Web Title: Dr Pramod Chaudhary First Asian Recipient Lifetime Achievement Award In Bio Economy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..