esakal | बारामती : डॉ. राजकुमार छाजेड यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkumar-Chajed

डॉ. राजकुमार खुशालचंद छाजेड (वय 59) यांचे आज निधन झाले. 

बारामती : डॉ. राजकुमार छाजेड यांचे निधन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : येथील प्रथितयश डॉ. राजकुमार खुशालचंद छाजेड (वय 59) यांचे आज निधन झाले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, म.ए. सो. विद्यालय येथे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले होते. बारामतीतील वैद्यकीय व्यावसायिकांच्या मेडिकोज गिल्डचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. एक निष्णांत होमिओपॅथिक तज्ज्ञ म्हणून त्यांची पंचक्रोशीमध्ये ख्याती होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

एखाद्या रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला द्यायचा असेल तर ते स्वत: त्या रुग्णाला घेऊन संबंधित डॉक्टराकडे घेऊन जात असत. मेडीकोज गिल्डच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबविले. त्यांचे वडील (कै.) खुशालचंद छाजेड हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अनेक वर्षे खजिनदार होते. वडीलांकडूनच त्यांनी आपल्या समाजकार्याचे बाळकडू घेतले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते सातत्याने तत्पर होते. म.ए.सो. विद्यालय व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रीत उपयुक्त योजना तयार करण्यावर त्यांचा सातत्याने भर असे. बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रातही ते लोकप्रिय होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील अनेकांना आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे त्यांनी विनामूल्य वाटप केलेले होते. लोकांना कोरोना होऊ नये म्हणून त्यांनी आवर्जून अनेकांना फोन करुन या गोळ्या देऊ केल्या होत्या, जेणेकरुन लोकांची प्रतिकारशक्ती वाढावी, असा त्या मागचा उद्देश होता. वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयातही मोलाचे मार्गदर्शन केले. 
विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय होता. बारामती येथील व्यावसायिक किशोरकुमार, सुरेश, अनिल, संतोष छाजेड यांचे ते बंधू तर लोकेश व रोहन छाजेड यांचे ते वडील होत.