पुण्याचा शैक्षणिक वारसा जम्मू-काश्‍मीरमध्ये रुजवा - डॉ. रवींद्र शिसवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

‘समाजविघातक शक्तींकडून पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजुतींवर विश्वास ठेवू नका, विकासाच्या प्रवाहात या. आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक कार्यासाठी उपयोग करा. तसेच, पुण्यातील सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीचा काश्‍मीरच्या दऱ्या-खोऱ्यांत प्रसार करावा,’’ असे आवाहन पोलिस सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काश्‍मिरी युवकांना केले.

पुणे - ‘समाजविघातक शक्तींकडून पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजुतींवर विश्वास ठेवू नका, विकासाच्या प्रवाहात या. आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक कार्यासाठी उपयोग करा. तसेच, पुण्यातील सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगतीचा काश्‍मीरच्या दऱ्या-खोऱ्यांत प्रसार करावा,’’ असे आवाहन पोलिस सहआयुक्‍त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काश्‍मिरी युवकांना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय गृहमंत्रालय आणि युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र, पुणेतर्फे काश्‍मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रम नवी पेठेतील शिक्षक भवनात १० ते १६ फेब्रुवारीदरम्यान केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे मंगळवारी उद्‌घाटन झाले. भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पूना कॉलेजचे प्राचार्य अन्वर शेख, सीआरपीएफचे सहायक कमांडंट तानाजी केसरकर, जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर उपस्थित होते.

साळुंखे यांनी काश्‍मिरी युवकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. केंद्रीय काश्‍मीर विद्यापीठातील आठवणींना उजाळा दिला. काश्‍मिरी युवकांमधील जिद्द, चिकाटी आणि कौशल्याचे विशेष कौतुक केले.

भारती विद्यापीठ हे काश्‍मिरी युवकांना ज्ञान व कौशल्य देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, श्रीनगर, पुलवामा या आतंकवाद प्रभावित जिल्ह्यातून युवक-युवती तसेच पुणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यातील तरुणांना महाराष्ट्रातील संस्कृती, कला, विज्ञान, शैक्षणिकदृष्ट्या औद्योगिक विकास आणि बदलती जीवनशैली यांची ओळख करून त्यांना मुख्य व राष्ट्रीय प्रवाहात आणणे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी देण्यासाठी नेहरू युवा केंद्र विशेष प्रयत्न करणार आहे, असे मानखेडकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr ravindra shisave talking