स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांना कसे सांभाळायचे सांगताहेत डॉ. संजय कुमावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schizophrenia patients
स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांना कसे सांभाळायचे सांगताहेत डॉ. संजय कुमावत

स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांना कसे सांभाळायचे सांगताहेत डॉ. संजय कुमावत

पुणे - स्किझोफ्रेनिया गंभीर मानसिक आजार आहे. स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांचे उपचारादरम्यान पुनर्वसन करणे तसेच, ‘व्होकेशनल स्किल लर्निंग’च्या माध्यमातून त्यांना कामात गुंतविण्यात येते. लॉकडाऊनच्‍या काळात या दोन्ही गोष्टी न झाल्याने या रुग्णांवर ही परिणाम झाला. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना त्यांना सांभाळणे अवघड झाले होते. भविष्यात अशी परिस्थिती आल्यास या रुग्णांना कसे सांभाळायचे, त्यांचे मन रमेल अशा गोष्टींमध्ये गुंतविणे अशा विविध गोष्टी कुटुंबातील सदस्यांनी देखील शिकणे आवश्‍यक आहे. असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय कुमावत यांनी व्यक्‍त केले.

चैतन्‍य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्‍य साधून ‘कोरोना नंतरच्या काळातील मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्रात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. रोहन जहागीरदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच या आजाराशी निगडित समस्यांबाबत व्यक्ती, कुटुंब आणि संस्थेच्या दृष्टिकोन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. स्किझोफ्रेनियाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. कुमावत म्हणाले, ‘लॉकडाऊनच्या काळात औषधांची उपलब्धतेची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे अशा रुग्णांना औषध पुरविण्याच्या समस्या देखील उद्भवल्या. आज ऑनलाइन सेवेच्या माध्‍यमातून ही औषधे मिळविण्यात येतात. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांसाठी विविध सपोर्ट ग्रुप्स देखील आहेत. या सपोर्ट ग्रुप्सने मेडिकल स्टोअर, ड्रग बँक आदींचा डेटा तयार करायला हवा. यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती भविष्यात आल्यास या अत्यावश्यक परिस्थितीमध्ये या रुग्णांना तातडीने औषधे उपलब्ध होतील.’

डॉ. वाटवे म्हणाले, ‘स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजारातील एक प्रकार आहे. स्किझोफ्रेनियाची लक्षणे किंवा उपचार हे एकाच प्रकारचे नसतात. कोरोना काळात रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. या रुग्णांना उपचारासाठी किंवा समुपदेशनासाठी घेऊन जाणे कठीण होते. समाजाशी संपर्क तुटला, संवाद कमी झाला. यामुळे रुग्णांच्या वर्तणुकीत ही बदल दिसून आले.’

कोरोना परिस्थितीतून धडे घेत भविष्यात अशा प्रकारच्या साथीच्या आजारांसाठी तयार राहणे गरजेचे आहे. रुग्णाचे आणि स्‍वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी तज्ज्ञांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रॉनी जॉर्ज यांनी केले.

यावर भर द्या -

- मानसिक आरोग्यासाठी छंद, योगा, व्यायाम करणे

- स्किझोफ्रेनिया रुग्णांना परिस्थितीबाबत संयमाने समजावून सांगणे

- त्यांना विविध कौशल्य कार्यामध्ये गुंतवणे

Web Title: Dr Sanjay Kumawat Tells How To Treat Schizophrenia Patients Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top