

100th Marathi Sahitya Sammelan Dr Sharankumar Limbale Chosen as President in Sahitya Mahamandal Meeting
esakal
पुणे: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावावर सहमती झाल्याने मंगळवारी (ता. २४) आपटे रस्त्यावरील हॉटेल कोरोनेट येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळाकडून लवकरच या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.