esakal | डॉ.शिवाजीराव मोहिते यांना ग्रंथ पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

mohite.

डॉ.शिवाजीराव मोहिते यांना ग्रंथ पुरस्कार

sakal_logo
By
मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) - महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा 2017-18 या वर्षातील अॅड. त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक (ललितगद्य) प्राचार्य डॉ शिवाजीराव मोहिते यांच्या 'साहित्य आस्वाद' या ग्रंथासाठी जाहिर झाला आहे. रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, शनिवार नवी पेठ पत्रकार भवनातील एस.एस. जोशी. सभागृहात उडिया लेखिका व ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

प्राचार्य डॉ मोहिते हे पुणे विद्यापीठाच्या ललित कला शाखेचे माजी अधिष्ठाता तर आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे माजी अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख होते. तसेच दापोडी येथील सी. के. गोयल महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे मराठीतील एक जेष्ठ साहित्यिक, समिक्षक व कवी असलेले डॉ. मोहिते यांनी आजवर अठरा पुस्तकांचे लेखन, संपादन व समिक्षा केली आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना हा पुरस्कार जाहिर केला आहे.  

सध्या डॉ. मोहिते हे राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेवर सचिव व रत्नाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलिप मोहिते पाटील व सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

loading image