esakal | एनसीएलचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सिन्हा यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Sinha

एनसीएलचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सिन्हा यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.बी. सिन्हा (वय ९३) यांचे निधन झाले. पदार्थ विज्ञान रसायनशास्त्रज्ञ असलेले डॉ. सिन्हा एनसीएलच्या भौतिकी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून १९५४ मध्ये त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली होती.

मॅग्नॅटीझम आणि सेमिकंडक्टर संबंधीच्या सैद्धांतिक संशोधनासाठी त्यांना ओळखले जात होते. सिरॅमिक सुपरकंडक्टींग मटेरीयलवर केलेले त्यांचे संशोधन एनसीएलच्या विभागातील बॅंचमार्क मानले गेले आहे. आजवर १३० शोधनिबंधांचे लेखन त्यांनी केले असून, ३४ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. १९७२ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते फेलो होते.

loading image
go to top