
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभाग रचना (गट, गण) करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचे काम सुरू केले आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी पूर्ण करून तो तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाला देणार आहेत. त्याप्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.