पुणे - पुणे शहरात मंगळवारी दुपारपासून सुरु झालेल्या पूर्व मौसमी पावसाने दाणादाण उडवली. महापालिकेने नाले सफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेचे काम पूर्ण होत आले आहे असा दावा केलेला असताना या पावसामुळे कामाचा फज्जा उडाला. तर शहराच्या अनेक भागात चौकाचौकात, रस्त्यावर पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनाची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.