खडकवासला कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; कचऱ्याचेही ढीग

खडकवासला धरणातून हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी असलेला उजवा कालवा पुणे शहरातील कचरा व सांडपाण्यामुळे दुषीत बनला
khadakwasla canal
khadakwasla canalSakal
Summary

खडकवासला धरणातून हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी असलेला उजवा कालवा पुणे शहरातील कचरा व सांडपाण्यामुळे दुषीत बनला

किरकटवाडी - खडकवासला धरणातून (Khadakwasala Dam) हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) असलेला उजवा कालवा (Canal) पुणे शहरातील कचरा (Garbage) व सांडपाण्यामुळे (Drainage Water) दुषीत बनला असून याचा शेतीसह नागरिकांच्या आरोग्यावरही (Health) गंभीर परिणाम होत आहे. कालव्यामध्ये सांडपाणी सोडले जात असताना व राजरोसपणे कचरा टाकला जात असताना हे थांबविण्यासाठी पुणे मनपा व पाटबंधारे विभागाकडून त्याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही वर्षांत कालव्याचे पाणी वापरण्यायोग्य राहणार नाही अशी भीती जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

खडकवासला उजव्या कालव्याची एकूण लांबी 214 किलोमीटर आहे. यातील सुमारे 30 किलोमीटर अंतराचा कालवा पुणे शहरातून व उपनगरांतून जातो. धरणापासून पुढे पुर्ण कालव्यात सध्या प्लॅस्टिक, जुने कपडे, निर्माल्य, पोत्यात भरलेला ओला कचरा व इतर टाकाऊ वस्तूंचा अक्षरशः खच पडलेला दिसून येत आहे. तसेच अनेक वस्त्यांमधीर सांडपाणी कालव्याच्या पाण्यात सोडलेले असल्याने पाणी दुषीत होत आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरी या कालव्याला लागून असल्याने कालव्याचे दुषीत पाणी निचरा होऊन या विहिरींमध्ये जाते. त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच हे दुषीत पाणी पुढे शेतीसाठी वापरले जात असल्याने जमीनी क्षारपड होत आहेत. प्रशासनाने याबाबत दखल घेऊन कालव्याचे प्रदुषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल अशी चिंता जलसंवर्धन व स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

khadakwasla canal
पुणे महापालिका शाळेसाठी ठराविक ॲप खेरदीचा घाट

"ज्या ठिकाणी कालव्यात सांडपाणी सोडले जात आहे ती ठिकाणं प्रशासनाने शोधली पाहिजेत. संबंधीतांवर कडक कारवाई व्हायला हवी.कालव्यात कचरा व निर्माल्य टाकू नयेत यासाठी जनजागृती करायला हवी. कालवा स्वच्छतेसाठी व संरक्षणासाठी प्रशासनाने धोरण ठरवणे आवश्यक आहे." पराग मते, वी पुणेकर्स संघटना.

"सांडपाण्यामध्ये घातक रसायने असल्याने व ते थेट पाण्यात मिसळत असल्याने कालव्याचे पाणी दुषीत होत आहे. या दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनीतील जैविक घटकांचा ऱ्हास होत आहे. प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे व जलसंपत्ती वाचवणे आवश्यक आहे." शैलेंद्र पटेल, जलदेवता सेवा अभियान, निवृत्त संशोधक (डीआरडीओ)

"प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे हा त्याचा अधिकार आहे मग तो शहरी असू द्या अथवा ग्रामीण भागातील. आज पुणे शहर हद्दीबाहेरील नागरिकांना अशुद्ध आणि आरोग्यास हानिकारक ठरत असलेला पाणीपुरवठा होत आहे. पुणे पालिका हद्दीत पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. मोठ्या प्रमाणावर कचरा कालव्यात टाकला जात आहे. इतकेच काय मैलापाणी ,सांडपाणी हेही मिसळले जात आहे.हा एकप्रकारे मनुष्य वध करण्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल.त्यामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये यासाठी उपाययोजना होण्याची गरज आहे."

- प्रशांत कनोजिया, संस्थापक,हेल्प रायडर्स प्रतिष्ठान.

"कालव्यामध्ये कचरा टाकणारे व सांडपाणी सोडणारे यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेला कळवले आहे. पाटबंधारे विभागाकडूनही कारवाई करण्यात येणार आहे." पोपटराव शेलार, स्वारगेट उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com