

Wild Gaur Rescued Safely After Challenging Operation on Pune's Sinhagad Road
esakal
-जागृती कुलकर्णी
सिंहगड रस्ता: मंगळवारची ती दुपार नेहमीसारखीच संथ होती. पण अचानक विश्रांती नगर परिसरात एकच धावपळ उडाली आणि अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण सिंहगड रस्ता परिसर एका मूक वन्यजिवाच्या सुटकेसाठी एकवटला. पाण्याच्या दोन महाकाय बंदिस्त वाहिन्यांच्या अरुंद जागेत अडकलेल्या एका अवाढव्य रानगव्याला (बायसन) केवळ वाचवलेच नाही, तर अत्यंत संवेदनशीलतेने त्याला जीवनदान बहाल करत सुखरूप सुटका करण्यात बचाव यंत्रणांना यश आले. 'माणुसकी आणि कर्तव्याची' एक अनोखी सांगड आज पुणेकरांना या थरारक "रेस्क्यू ऑपरेशन"च्या निमित्ताने पाहायला मिळाली.