पिंपरी शहरात होणार सांडपाण्याचा पुनर्वापर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पिंपरी - शहरात सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणीसाठी नागरिकांचा खासगी सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी धोरण व कृती आराखडा निश्‍चित केला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

पिंपरी - शहरात सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणीसाठी नागरिकांचा खासगी सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी धोरण व कृती आराखडा निश्‍चित केला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. प्रक्रियायुक्त पाण्याच्या वितरणासाठी ६०७ किलोमीटरचे प्राथमिक जाळे उभारावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत क्षेत्रनिहाय विकासात पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी क्षेत्रात कासारवाडी मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातून प्रतिदिन ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. त्यासाठी अल्ट्रा फिल्टरेशन व अल्ट्रा व्हायोलेट पद्धतीचा वापर करून प्रतिदिन ७५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र कासारवाडीत उभारण्यात येणार आहे.

चिखलीत प्रतिदिन पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारले जाईल. प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यासाठी सल्लागारामार्फत शहरासाठी विस्तृत बृहत्‌ आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शहराच्या भौगोलिक रचनेनुसार चार भाग केले असून शहरासाठी रोज १२० दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

कोण काय म्हणाले...
 एकनाथ पवार : पाण्याच्या पुनर्वापराबाबत सदस्यांनी माहिती द्यावी
 सीमा सावळे : या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना वापरण्यायोग्य पाणी देता आल्यास त्याचा फायदा होईल 
 मंगला कदम : प्रकल्प चांगला आहे. मात्र, प्रक्रियायुक्त पाणी महापालिकेने नुकसान सहन करून वापरासाठी देऊ नये 

Web Title: Dranage Reuse in Pimpri City