Corona virus आयसोलेशन शेल्टर'साठी पुण्यातील डीआरडीओ सज्ज

DRDO in Pune ready for Isolation Shelter for corona virus
DRDO in Pune ready for Isolation Shelter for corona virus
Updated on

पुणे : देशभरात कोरोना विषाणूचा वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे सध्या वैद्यकीय संसाधनांची मागणी सुद्धा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) वतीने विविध संसाधनांच्या निर्मितीवर भर दिला असून सध्या पुणे येथील आरएनडीइ तर्फे 'आयसोलेशन शेल्टर'ची (विलगीकरण कक्ष) निर्मिती करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
डीआरडीओ तर्फे पुण्यातील रक्षा पॉलीकोट्स प्रायव्हेट लिमिटेड व ऍक्युरेट सावन डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांना 'आयसोलेशन शेल्टर'च्या उत्पादनासाठी नेमण्यात आले आहे. या शेल्टरमध्ये साधारणपणे 2 व्यक्तींना विलगीकृत करून ठेवण्यात येते पण शेल्टरचा आकार गरजेनुसार छोटा किंवा मोठा करण्यात येऊ शकतो. तसेच गरजेनुसार बेड्सची संख्याही वाढविण्यात येऊ शकते. हे आयसोलेशन शेल्टर हलक्या वजनाचे असून याला हवं त्या ठिकाणी उभारणे सोपे आहे. याच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारच्या कापडाचा व 'मॉड्युलर' वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती डीआयआयटीएमचे संचालक डॉ. मयंक द्विवेदी यांनी दिली.

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण

डीआरडीओ तर्फे व्हेंटिलटर्स, सॅनिटायझर, फेस शिल्ड मास्क, पीपीई सारख्या विविध संसाधनांच्या निर्मितीसाठी सुमारे 30 खाजगी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. तसेच डीआरडीओ अंतर्गत येणाऱ्या देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये या सर्व यंत्रणांची डिझाईन, तंत्रज्ञान आदींवर काम केले जात असून मोठ्या प्रमाणात या यंत्रणांच्या निर्मितीसाठी विविध कंपनींची मदत घेतली जात असल्याचेही डॉ. द्विवेदी यांनी सांगितले.

खडकी कॅन्टोन्मेंट भाजी मंडई पॅटर्न ठरतोय आदर्श
रक्षा पॉलीकोट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत सरकार म्हणाले, "सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विलगीकरण कक्षांची गरज पण वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला सुमारे 500 आयसोलेशन शेल्टरच्या उत्पादनावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे व यासाठी केवळ उत्पादन खर्च घेतला जाणार आहे." 

लायगुडे रुग्णालयात सुधारणा; 'क्वारंटाईन' नागरिकांना दिलासा
या आयसोलेशन शेल्टरसाठी प्रशासनाने अथवा रुग्णालयांनी 9823024322, 7796688201 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डीआरडीओ तर्फे करण्यात आले आहे.

शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!l
आयसोलेशन शेलतरची वैशिष्ट्य
- फोल्डिंग बेड, स्टूल, टेबल, 'इलेक्ट्रिक केटल' सारख्या वस्तू
- जलरोधक (वॉटरप्रूफ) कापडाचा वापर 
- 'माईल्ड मेटल'चा वापर
- दरवाज्याच्या दोन्ही बाजूला 'झिप' (चेन) त्यामुळे दोन्ही बाजूने दरवाजा उघडण्यास सोपे
- शेलतरमध्ये दोन व्यक्तींना विलगीकृत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भिंतीला काढणे सोपे
Lockdown : ऑनलाईन सेवेद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा होणार
रुग्णालयांना हे आयसोलेशन शेल्टर घेण्यासाठी केवळ याचा उत्पादनाला लागलेला खर्च द्यावा लागेल. याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. सध्या याचा वापर व्यावसायिक पातळीवर नसून या कठीण परिस्थितीमध्ये अशा संसाधनांची वेळेत उपलब्धी करून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे."

- अभिजीत सरकार, रक्षा पॉलीकोट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com