Ashadhi Wari 2025 : जागरूकतेची कृती; युवकांचं पालखी मार्ग स्वच्छता अभियान
Palkhi Sohala : उरुळी कांचन येथे पालखी सोहळ्यानिमित्त ड्रीम्स फाउंडेशनच्या युवकांनी राबवलेल्या स्वच्छता उपक्रमातून परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्यात आला.
उरुळी कांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त येथील परिसर स्वच्छ करण्यासाठी ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने स्वच्छता जनजागृती आणि पालखीमार्ग स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.