A driver IT robbed engineer woman while teaching car in Pune
A driver IT robbed engineer woman while teaching car in Pune

पुण्यात कार शिकवताना ड्रायव्हरने आयटी इंजिनिअर महिलेला लुटले; हात बांधून कटरने तोडल्या अंगठ्या

Published on

पुणे ः कार चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्याने मित्राच्या मदतीने एका आयटी इंजिनिअर महिलेचे हात बांधून लुटल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 10) सकाळी एनआयबीएम रोड परिसरात घडला. आरोपींनी कटरच्या साहाय्याने महिलेच्या बोटातील चार अंगठ्या आणि सोनसाखळी तोडून चोरली. त्यानंतर तिच्या गुगल पे व एटीएमच्या माध्यमातून 50 हजार रुपये काढून घेतले आहेत.


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत साळुंके विहार परिसरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कार चालविण्याचे प्रशिक्षण देणारा राजेश सिंग माही (रा. साळुंके विहार) आणि त्याच्या मित्रावर जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या बंगळूर येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. त्या साळुंके विहार परिसरात आई-वडिलांसोबत राहतात. गेल्या आठ दिवसांपासून त्या सिंगकडे कार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. घटनेच्या वेळी सिंग हा एका मित्रासोबत फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने तक्रारदार यांना मित्राच्या फियाट कारवर आज ड्रायव्हिंग करायचे असल्याचे सांगून त्यांना घेऊन गेला. उंड्री परिसरापर्यंत तो त्यांना कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होता. पण, त्या ठिकाणी चढ आल्यानंतर त्याने तक्रारदार यांना बाजूच्या सीटवर बसविले.

कोण घालणार आवर, समाजमंदिरावर टॉवर! भाड्यापोटी येणारे शुल्क नगरसेविकेच्या पतीच्या खिशात

तक्रारदार बाजूच्या सीटवर असताना मागे बसलेल्या सिंगच्या मित्राने अचानक त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. तसेच, त्यांचे हात बांधून टाकले. उंड्रीपासून ते एनआयबीएम रस्ता परिसरात येईपर्यंत आरोपींनी तक्रारदार यांच्या गुगल पेवरून 40 हजार रुपये काढून घेतले. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

फिर्यादींच्या घरी जाऊन एटीएम कार्ड चोरले 
फिर्यादी यांना बांधून ठेवल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून घराची चावी घेतली. त्याच्या मदतीने घर उघडून त्यांची पर्स आणली. त्यामधील एटीएम कार्डच्या मदतीने दहा हजार रुपये काढून घेतले. त्यांच्याजवळील रोकडही घेतली. तक्रारदार यांच्याकडील एक लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून दोघे पळून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com