
पुणे : पेट्रोल व डिझेल भरुन पुण्यात येणारा टँकर सोमवारी मध्यरात्री रामटेकडी येथे पलटी झाला. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून त्यास अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढत रुग्णालयात हलविले. सुदैवाने टँकरमधील पेट्रोल व डिझेलची गळती झाली नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अण्णा मोटे असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.हडपसर अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, मोटे हे त्यांच्या ताब्यातील टँकर हा लोणीकंद येथून रामटेकडीमार्गे पुण्यात घेऊन येत होता. सोमवारी मध्यरात्री एक वाजता टँकरचा रामटेकडी येथे अपघात झाला. या अपघातात टँकरचा पुढचा भाग पूर्णपणे तुटला. त्यामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याने त्यास बाहेर पडता येत नव्हते. नागरीकांनी अग्निशामक दलास याबाबत खबर दिली. त्यानंतर काही वेळातच दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने चालकास बाहेर काढले. त्यानंतर त्यास उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात पाठविले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना
दरम्यान, टँकरमध्ये 20 हजार लीटर डिझेल व 5 हजार लीटर पेट्रोल होते. अपघातात टँकरच्या पुढील भागाचे नुकसान झाले, सुदैवाने टाकीकडील भाग सुरक्षित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.