पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

पुण्यातील विसर्जन मिरवणूक म्हटलं, की पालखीत विराजमान झालेले गणराय, रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले हजारो भाविक अन्‌ त्यांचा उत्साह वाढविणारे ढोल-ताशा पथकाचे तालबद्ध वादन असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. यंदा मात्र हे चित्र दिसणार नाही. त्यामुळे वादनाविना वादकांचे हात थरथरत असून, मन अस्वस्थ आहे.   

पुणे - पुण्यातील विसर्जन मिरवणूक म्हटलं, की पालखीत विराजमान झालेले गणराय, रस्त्याच्या दुतर्फा थांबलेले हजारो भाविक अन्‌ त्यांचा उत्साह वाढविणारे ढोल-ताशा पथकाचे तालबद्ध वादन असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. यंदा मात्र हे चित्र दिसणार नाही. त्यामुळे वादनाविना वादकांचे हात थरथरत असून, मन अस्वस्थ आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिरवणूक सुरू ढोल-ताशांच्या नादाने वातावरण बदलून जाते. भक्तीचा हा ज्वर पुढचे अनेक तास पुण्यातील रस्त्यांवर अनुभवण्यास येतो. चौकाचौकांत मनोरे करून त्यावर ताशा वाजवणारे तरुण, लहान मुले म्हणजे खास आकर्षण. मराठी नट-नट्यांचा सहभाग, झांजेतून निघणारा स्वर, उंच नाचणारे ध्वज अन्‌ हजारो भाविकांकडून ‘मोरया मोरया’च्या घोषणा हे सगळे वातावरण अद्भुत असते; पण यंदा यातील काहीच अनुभवास येणार नाही. यामुळे वादक निराश झाले आहेत. 

भामा आसखेड आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा; मोठा संसर्ग होण्याची शक्यता

ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, ‘‘ढोल-ताशा पथक हे पुण्याच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या पथकांमुळे मिरवणूक सजते, रंगते, भक्त आनंद घेतात. मनसोक्त दाद देतात; पण यावर्षी आम्हाला ही दाद मिळणार नाही. मिरवणुकीविना आणि ढोल-ताशाविना गणरायाला निरोप देण्याची वेळ आल्याने वादकांच्या मनाची घालमेल सुरू आहे.’’  

- समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

इतर वेळी विसर्जनाच्या आदल्या दिवशी आमची लगबग सुरू असते; पण यंदा मिरवणूक नसल्याने आज आम्ही शांत बसलो आहोत, वादक एकमेकांना भेटले नाहीत, याची खंत मनामध्ये आहे. कोरोनाचे संकट मोठे असल्याने सर्वांनाच संयमाने वागावे लागत आहे, पण पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने वादन करू.
- केतन देशपांडे, गजलक्ष्मी पथक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpati immersion procession will be held in Pune without dholtasha