पुणे - सद्य:स्थितीत पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या वाहनांची संख्या ४२ लाखांहून अधिक आहे. वाहनांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होत आहे, त्या प्रमाणात चालकांच्या संख्येतही वाढ होत आहे..जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक लाख ८३ हजार ८९४ वाहन परवाने वितरित केले आहेत. मागील वर्षी ही संख्या एक लाख ३९ हजार ६०६ इतकी होती. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४४ हजार २८८ परवाने अर्थात चालकांची वाढ झाली आहे. ही वाढ ३२ टक्क्यांहून अधिक आहे..झपाट्याने विस्तारणाऱ्या पुण्यात वाहनांच्या संख्येत दरवर्षी मोठी वाढ होत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदविलेल्या वाहनांची संख्या ही ४२ लाख ३३ हजार ९८ इतकी आहे. पुण्यात दरवर्षी सुमारे तीन लाखांहून अधिक नवीन वाहनांची विक्री होते. वाहनांच्या संख्येसोबतच वाहन परवान्यांची संख्या देखील वाढत आहे..वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई, वाहन परवाना मिळविण्याची सुलभ झालेली प्रक्रिया, वाहनांशी निगडित रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पुण्यात वाहन परवाना वितरित होण्याचे प्रमाण वाढले आहे..‘इ’, सीएनजी वाहनांचा वाढता प्रवासपुणे आरटीओने नोंदविलेल्या ४२ लाख वाहनांमध्ये सीएनजी व इ-वाहनांची संख्या देखील काही प्रमाणात वाढत आहे. पुण्यात सद्यस्थितीत सीएनजी वाहनांची संख्या ही तीन लाख २५ हजार ३४५ इतकी आहे, तर इ-वाहनांची संख्या ही एक लाख ४१ हजार ६७८ इतकी आहे. इ-वाहनांच्या तुलनेत सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे, असे असले तरीही या दोन्ही प्रकारच्या वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे..शहराच्या वाहतूक शिस्तीसाठी चालक हा प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. वाहन परवान्यांची ही वाढ केवळ आकडेवारी नसून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाला दिलेले महत्त्व दर्शवते. परवाना प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे आणि कठोर दंडात्मक कारवाईमुळे परवानाधारक चालकांची संख्या वाढत आहे.- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.