

ड्रोनचा वापर करून
दहशतवाद्यांना टिपले
पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा येथे कारवाई
पेशावर, ता. १२ (पीटीआय) : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी बुधवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, १६ जण जखमी झाले आहेत. बन्नू जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी ‘हायटेक’ तंत्रज्ञान आणि ड्रोनचा प्रभावी वापर करून हल्ले केले.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बन्नू जिल्ह्यात ही कारवाई तीव्र केली. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. झाडांखाली लपलेल्या; तसेच दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘क्वाडकॉप्टर’च्या साह्याने हवेतूनच अचूक टिपण्यात आले.
मदरशाचा लपण्यासाठी वापर
दहशतवादी लपण्यासाठी एका मदरशाचा वापर करीत असल्याची माहिती समोर आल्यानंतर, कारवाईपूर्वी स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता. यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
सैन्याची कारवाई तीव्र
बन्नू परिसरात गेल्या काही दिवसांपासून सैन्याची कारवाई तीव्र झाली आहे. मंगळवारीच जनी खेल भागातील अदनान क्रिकेट स्टेडियमजवळ सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर बुधवारी ड्रोनच्या मदतीने राबवलेल्या या मोठ्या मोहिमेमुळे दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.