
पुणे : पुणे जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना त्याची पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलिस ठाण्यास कळवून परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी काढले आहेत.