दक्षिण सोलापूरमधील २१ गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश करा!

दक्षिण सोलापूरमधील २१ गावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश करा!
Published on: 

दक्षिण सोलापूरमधील २१ गावांना टंचाईचा आराखडा हवा!
आमदार सुभाष देशमुख यांचे निवेदन; टँकरसह उपाययोजनांचा लाभ देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यात उर्वरित २१ गावांचा समावेश करावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आगामी तीन महिन्यांसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, तालुक्यातील २१ गावांचा त्यात समावेश नसल्याने पाणीटंचाईच्या काळात तेथील नागरिकांना शासकीय उपाययोजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचा आराखड्यात तातडीने समावेश करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, अशी मागणी देशमुख यांनी केली.
टंचाईच्या काळात गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि अन्य उपाययोजना राबविण्यासाठी गावांचा आराखड्यात समावेश आवश्यक आहे. एकही गाव मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
------------------------
या २१ गावांचा समावेश करण्याची मागणी
फताटेवाडी, होटगी स्टेशन, सावतखेड, हत्तूर-चंद्राळ, कुलकर्णी तांडा, संजवाड, औराद, राजूर, हत्तरसंग, कुडल, वांगी, वडकबाळ, अकोले (मं), मनगोळी, गावडेवाडी, टाकळी, चिंचपूर, वडापूर, कुसूर-खानापूर, भंडारकवठे आणि तेलगाव (मं).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com