CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - दुष्काळाच्या संकटात यापूर्वी शेतकऱ्यांना पंधराशेपेक्षा जास्त रुपयांची मदत कोणत्याही सरकारने केली नाही. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रक्रियेत अडकवून न ठेवता आम्ही पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत विरोधकांतील काही संपन्न लोकांना पाच हजार रुपयांचे महत्त्व कदाचित समजणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.