आपत्ती (दुष्काळ) व्यवस्थापन योजना'' तयार करून अंमलबजावणी सुरू करा !

आपत्ती (दुष्काळ)  व्यवस्थापन योजना''  तयार करून अंमलबजावणी सुरू करा !
Published on

दुष्काळ व्यवस्थापन योजना तातडीने कार्यान्वित करा
--
कृती आराखडा राबविण्याची डॉ. संजय लाखे पाटील यांची मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिक विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील ‘दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना’ तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तथा शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

डॉ. लाखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय हवामान विभाग (आयएमडी), स्कायमेट तसेच विविध आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन संस्थांनी एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झालेला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दुष्काळ देखरेख समित्या कार्यान्वित करून राज्य, जिल्हा, तालुका, मंडळ आणि ग्रामस्तरावर दुष्काळ व्यवस्थापन योजना राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या ‘मॅन्युअल फॉर ड्रॉट मॅनेजमेंट’ मार्गदर्शिकेनुसार दुष्काळ निर्धारण, जाहीर करणे, निवारण आणि मदत वाटपासाठी निश्चित केलेल्या कायदेशीर चौकटीचे पालन करणे राज्य सरकारवर बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com