Tuberculosis (TB) : क्षयरोगाच्या औषधांची राज्यात टंचाई

देश २०२५ पर्यंत क्षयरोग (टीबी) मुक्त करण्याची भीमगर्जना करणाऱ्या केंद्र सरकारने या भयंकर रोगावर रामबाण ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा केला नाही. त्यामुळे राज्यात ‘टीबी’च्या औषधांचा दुष्काळ पडला आहे.
Tuberculosis
Tuberculosissakal

पुणे : देश २०२५ पर्यंत क्षयरोग (टीबी) मुक्त करण्याची भीमगर्जना करणाऱ्या केंद्र सरकारने या भयंकर रोगावर रामबाण ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा केला नाही. त्यामुळे राज्यात ‘टीबी’च्या औषधांचा दुष्काळ पडला आहे. एकेका रुग्णाच्या औषधांचे डोस चुकू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांची दिवस-रात्र धडपड सुरू असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात प्रथमच औषधांचा खडखडाट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

क्षयरोग निर्मूलनात औषधे अत्यंत महत्त्वाची ठरतात. कारण, योग्य प्रमाणात नियमित औषधे घेतल्याशिवाय क्षयरोगाचे जंतू दाद देत नाहीत. औषधांचा डोस कमी झाल्यास किंवा अर्धवट घेतल्यास अथवा नियमित न घेतल्यास या जंतूमध्ये औषधांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे रुग्णाचे मूलभूत उपचार थांबवून ‘मल्टी ड्रग्ज रेजिटन्स’ (एमडीआर) होतो. त्यामुळे रुग्णाला आणखी प्रभावी औषधे द्यावी लागतात. या खर्चाचा बोजा आरोग्य व्यवस्थेवर पडतो. केंद्रातील ‘सेंट्रल टीबी डिव्हिजन’तर्फे खरेदी करून औषधे पूर्ण देशात वितरित केली जातात. या वर्षी अद्यापपर्यंत औषधांची खरेदी झाली नाही. त्यामुळे अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला.

दिवसाला १० ते १५ गोळ्या

रुग्णाच्या वजनानुसार डोस ठरविला जातो. सामान्यतः पहिल्या दोन महिन्यांत चार औषधांची मिळून तयार केलेली एक गोळी (४ एफडीसी – फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) घ्यावी लागते. तर, पुढील तीन महिन्यांमध्ये तीन औषधांची मिळून केलेली (३ ‘एफडीसी’) गोळी पुढील चार महिने घेणे बंधनकारक असते. मात्र, या गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून या एकत्रित केलेल्या औषधांच्या वेगवेगळ्या गोळ्या दिल्या जात आहेत. त्यामुळे एकेका रुग्णाला दिवसाला १० ते १५ गोळ्या घ्याव्या लागत आहेत. पण, त्याचाही तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे.

पर्यायी व्यवस्था काय केली?

  • राज्याच्या खरेदी प्राधिकरणातून औषध खरेदीची प्रक्रिया सुरू

  • जिल्ह्यांना स्थानिक पातळीवर खरेदीसाठी निधी

  • एकत्रित गोळ्या देण्यापेक्षा वेगवेगळी औषधे देण्यात येत आहेत

  • ‘एनआरएचएम’ निधीतून थेट दुकानातून औषध खरेदी करून देण्याच्या सूचना

केंद्राकडून क्षयरोगाच्या औषधांचा पुरवठा न झाल्याने महाराष्ट्र खरेदी प्राधिकरणाकडून औषध खरेदी करण्यात येत आहे. ती आता अंतिम टप्प्यात आहे. या खरेदीला वेळ लागत असल्याने प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी स्थानिक पातळीवर एक महिन्यांसाठी औषध खरेदी करण्यासाठी दिला आहे. दरम्यान, केंद्राकडून ‘४ एफडीजी’च्या काही गोळ्या आल्या आहेत. पुढील चार-पाच दिवसांमध्ये मिळतील.

- डॉ. संदीप सांगळे, सहसंचालक, क्षयरोग आणि कुष्ठरोग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com