Pune police seize 7,000 illegal intoxicant pills, arrest two accused
पुणे : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत घातक गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे सात हजार गोळ्यांचा साठा जप्त केला. शहरातील कोंढवा, हडपसर, कासेवाडी, कॅम्प आणि येरवडा परिसरात गुंगीकारक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हमीद शेख (वय ४०, रा. बुर्ज अल मर्जान, कोंढवा) आणि सुनील गजानन शर्मा (वय ३४, रा. सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.