

पुणे - ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीतून मोठी नेक्सस बाहेर येणार आहे. त्यावेळी यातून आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील,’’ असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबई पोलिसांनी पाटील आज अटक केल्यानंतर फडणवीस हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आम्ही परिषद घेऊन त्यावर आम्ही सर्व युनिट्स कामाला लावले होते. याच दरम्यान मुंबई पोलिसांना देखील नाशिकची माहिती मिळाल्यानंतर तेथे धाड टाकली. इतर ठिकाणीही धाडी टाकल्या आहेत.
ललित पाटील हातामध्ये आला आहे, त्यामुळे मोठे जाळेही बाहेर येईल. त्यामध्ये मला काही गोष्टी कळल्या आहेत. पण त्याबद्दल नीट माहिती घेऊन योग्य वेळी मी बोलेन. पण यातून एक मोठी नेक्सस आम्ही बाहेर काढणार आहोत. यातून जे बाहेर येईल, तेव्हा अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील.
मी पळालो नाही तर मला पळून जाण्यास भाग पाडले गेले असा आरोप पाटीलने केले आहे, त्याबाबत फडणवीस यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘ललित पाटील काय बोलतो, याकडे लक्ष देण्यापेक्षा आता पोलिस तपासातून जे बाहेर येईल, त्यावर लक्ष दिले पाहिजे. पोलिस तपासात नेक्सस बाहेर आलं की, सगळ्यांची तोंड गप्प होतील. पोलिस सर्व तपास करत आहेत. दोषींना अजिबात सोडणार नाही. सगळ्यांवर कारवाई केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.