Drunk and Drive
sakal
पुणे/कोथरूड - मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर घडली. या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारचालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोथरूड पोलिसांनी २४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.