
पुणे - वाहतुकीचे नियमन करण्यासाठी निघालेल्या वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या कारला भरधाव वेगातील मद्यधुंद कार चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांना सुदैवाने इजा झाली नाही. शुक्रवारी (ता. १५) संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंढवा चौक परिसरात हा अपघात झाला.