

Pune Accident
sakal
पुणे : काळेपडळ परिसरातील श्रीराम चौकात सोमवारी रात्री बेफाम वाहनचालकाने एकामागून एक सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारचालक दारूच्या नशेत मोटार चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.