
पुणे : मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने दहा अत्याधुनिक ‘ब्रीथ ॲनालायजर’ यंत्रे खरेदी केली आहेत. ही अद्ययावत यंत्रे इंटरनेटद्वारे वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि मुख्य पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडली आहेत. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर केली जाणारी कारवाई प्रभावी आणि पारदर्शक होणार आहे.