पुण्यात आजपासून 4 दिवस 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. मदतानाच्या 48 तास अगोदर मद्यविक्री आणि बार बंद ठेवणार आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला मद्यविक्री बंद असल्याने ड्राय डे असणार आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात 4 दिवस 'ड्राय डे' असणार आहे कारण, पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे  4 दिवस मद्यविक्री, परमिट रुम आणि बार बंद  ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. मदतानाच्या 48 तास अगोदर मद्यविक्री आणि बार बंद ठेवणार आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबरला मद्यविक्री बंद असल्याने ड्राय डे असणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, 29 नोव्हेंबरला सांयकाळी 5 नंतर मद्यविक्री करणारे शॉप आणि बार बंद  करण्यात येणार आहे.  30 नोव्हेंबर हा मतदानाच्या अगोदरचा दिवस असल्याने मदयविक्री बंद राहणार आहे. 1 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान राहणार आहे. मतदान संपल्यानंतर शॉप्स आणि बार उघडले जाणार आहेत. 2 डिसेंबरला निवडणूकीविषयी कोणतेही कामकाज  नाही. त्यामुळे त्यान दिवशी दिवसभर मद्यविक्री करणारे बार आणि शॉप सुरु राहणार आहेत. दरम्यान, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे मतमोजणी असलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मद्य विक्री बंद राहणार आहे. 

याबाबत, निवडूक आयोगाच्या  सुचना आणि जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार चार दिवस दिलेल्या वेळांमध्ये मद्यविक्रीची शॉप आणि बार बंद राहतील, संबधित विभागाच्या निरीक्षकांना आदेशाचे पालन व्हावे यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती, राज्या उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली.

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry day in Pune from today Collector's order Pune Graduate Election