नागपूर : इराण- इस्राईल, भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धामुळे सुकामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात किसमिस, मगज बिज, विलायची, अंजीर, आक्रोडचा समावेश आहे. या सर्वच सुकामेव्यांमध्ये प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. .पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला होता. याचा थेट परिणाम उद्योग आणि व्यापारावर झाला. भारतात ६० ते ७० टक्के सुकामेवा अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे आयात होतो. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे अटारी-वाघा सीमेवरील व्यापार बंद झाला होता. पाकिस्तानमार्गे देणारे सुकामेव्याचे ट्रक अफगाणिस्तानातच अडकले होते. अद्याप आवक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले..भारत-पाकिस्तान संबंध बिघडल्याने अफगाणिस्तानातील आयात दुबईमार्गे करावी लागली. त्यामुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली. भारतात दरवर्षी अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन सुकामेवा आयात होतो. त्यात बदाम, काळे-हिरवे किसमिस, अक्रोड आणि पिस्ता यांचा समावेश आहे. मात्र, गेल्यावर्षी या सर्वच सुकामेव्याच्या उत्पादनात घट झाली..याचाही दरवाढीवर परिणाम झाला आहे. सुकलेल्या अंगुराचे भाव वाढल्याने किसमिसच्या दरातही वाढ झाली आहे. तसेच उत्पादनही कमी असल्याचा फटका बसला आहे. कोरोनाच्या प्रदूर्भावानंतर अंगुराचे दर कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. आता उत्पादन कमी आणि मागणी वाढल्याने किसमिसच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे..सुकामेवा पूर्वीचे दर आताचे दर (किरकोळ दर)किसमीस २५० ५००मगज बि ६०० ८००अंजीर १५०० १८००आक्रोड बीज १२०० १६००विलायची ३१०० ३४००खोबरा डोल २५० ५००.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.