पाणी स्वच्छ करणारी "डकवीड" वनस्पती

प्रविण खुंटे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे : 'डकवीड' या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने ही समाधी दूषित झाली होती. नदी पात्रातील ओंकारेश्‍वर मंदिराच्या जवळ ही समाधी आहे. 

पुणे : 'डकवीड' या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने ही समाधी दूषित झाली होती. नदी पात्रातील ओंकारेश्‍वर मंदिराच्या जवळ ही समाधी आहे. 

संपूर्ण शहरातील शेकडो जागा कचऱ्याच्या, सांडपाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. " लेम्नीऑन ग्रीन सोल्यूशन या कंपनीच्या प्रसन्न जोगदेव या तरुणाने केळकर यांची समाधी स्वच्छ करण्याचा पायलट प्रकल्प राबवीला आहे. 'डकवीड' या लेमनेशिया जातीच्या वनस्पतीचा वापर त्यांनी पाणी स्वच्छ करण्यासाठी केला. या पाण्यामध्ये गप्पी मासेही टाकण्यात आले आहेत. यामुळे पाणी शुद्ध होण्यास आणखी मदत झाली. 

या डकवीड वनस्पतीचा रंग हिरवा असल्यामुळे पाण्यावर हिरवा थर साचलेला दिसतो. परंतु, त्याखाली पाणी स्व्छ झालेले असते. असे असले तरी नागरिक त्यामध्ये कचरा टाकणं सोडायला तयार नाहीत. यासाठी एका एनजीओ च्या मदतीने त्याचे रंगकाम करून, त्यावर चित्रे काढली. चौथरा रंगवून घेण्यात आला आहे. तरीही पिंडदानासाठी आलेले लोक राहिलेले साहित्य या समाधीच्या पाण्यात टाकत आहेत. नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे यांनी या प्रकल्पात खूप सहाय्य केले. तसेच नगरसेवक राजेश येनपुरे यांचे देखील सहाय्य लेम्नीऑन कंपनीला मिळाल्याचे जोगदेव यांनी सांगितले.

''आम्ही लेम्नीऑन मध्ये झाडे आणि सूक्ष्मजंतूंच्या माध्यमातून पाणी शुद्ध करणार्या सिस्टीम्स डिझाईन करतो. त्याचा पहिला प्रयोग आम्ही इथे केला आहे. या कामात मदत करणाऱ्यापेक्षा समाधी स्थळात कचरा टाकणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. इथे घाण करण्यावर निर्बंध घालणे जरुरीचे आहे.''
- प्रसन्न जोगदेव, संस्थापक, लेम्नीऑन ग्रीन सोल्यूशन

डकवीड या वनस्पती मुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन डासांचे प्रजनन कमी होते, दुर्गंधी कमी होते. या वनस्पतीची मुळे आणि सूक्ष्मजंतू याने पाणी शुद्ध होते फर्ग्युसन महाविद्यालयातील नील वाणी याने यातील होणारे जल शुद्धीकरण, डकवीड ची होणारी वाढ व पाण्याच्या चाचण्या करून त्यावर मास्टर्स चा प्रबंध लिहिला आहे.

Web Title: "Duckweed" plants that clean water