
अनेक राज्यात बर्ड फ्लू वाढल्याने भीतीपोटी चिकन खाणाऱ्या खवय्यांनी आज मात्र मटणाच्या दुकानात रांग लावली.
पुणे- अनेक राज्यात बर्ड फ्लू वाढल्याने भीतीपोटी चिकन खाणाऱ्या खवय्यांनी आज मात्र मटणाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केल्याने चिकनच्या दुकानात मात्र ग्राहकांची तुरळक संख्या दिसून आली. नुकताच मार्गशीर्ष महिना संपला त्यात आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासून चोखंदळ पुणेकरांची मटणाच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सध्या अनेक राज्यात बर्ड फ्लू वाढल्याने अनेकांनी चिकन, अंडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. सध्या उपनगर भागातील एक किलो चिकन दर - एकशे ऐंशी रुपये तर साठ रुपये एक डझन अंडी असा दर सुरु आहे. तर मटणाचे दर सातशे रुपये किलो आहेत. सध्या मात्र मांसाहार प्रिय खवय्ये मटण खाण्याकडे वळल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले
प्रत्येक वर्षी बर्ड फ्लू येत असतो त्यामुळे चिकन अंडी विक्रीवर बऱ्याच पैकी परिणाम होत असतो. या रोगामुळे ग्राहक भीतीपोटी पाठ फिरवतात. जे ग्राहक चिकन खरेदी करण्यासाठी येतात त्यांना चिकन अंडी चांगले शिजवून खा असे सांगतो, असं चिकन विक्रेते महंमद पठाण म्हणाले.