esakal | बारामती : मुलगी झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यास दगडाने मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : मुलगी झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यास दगडाने मारहाण

मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून तालुक्यातील डोर्लेवाडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करणाऱ्या बापाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बारामती : मुलगी झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यास दगडाने मारहाण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून तालुक्यातील डोर्लेवाडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला दगडाने मारहाण करणाऱ्या बापाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी डोर्लेवाडी आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू नाना चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी कृष्णा बाळासाहेब काळे (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुलगी झाल्यानंतर दारुच्या नशेत कृष्णा काळे याने पत्नीस शिवीगाळ सुरु केली होती. आरोग्य केंद्रात सेवेस असलेल्या बाळू चव्हाण यांनी काळे यास बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, काळे याने चिडून डॉक्टरसह बाळू चव्हाण यांना दगडाने मारहाण करीत त्यांना जखमी केले. शुक्रवारी (ता. 26) दुपारी ही घटना घडली. या मारहाणीत बाळू चव्हाण जखमी झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, सरकारी कामात अडथळा आणण्याह शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.