पुणे : उसने पैसे मागितल्याने पतीला मारहाण; पत्नीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

​शुक्रवारी रात्री 10 वाजता आरोपी व त्याच्यासह 7 ते 8 जण फिर्यादी यांच्याकडे आले. त्यांनी फिर्यादीच्या पतीकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी तत्काळ पैसे देण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीचाही विनयभंग केला. 

पुणे : उसनवारीने दिलेल्या पैशांची मागणी केल्याच्या रागातून टोळक्‍याने महिलेच्या पतीस शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्याचबरोबर महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता कोंढवा बुद्रुक येथे घडली. 

मार्केट यार्ड येथील बुऱ्हानी कॉलनीमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना 50 हजार रुपये उसनवारीने दिले होते. ते पैसे परत द्यावे, यासाठी महिलेने संबंधीत व्यक्तींना शुक्रवारी बोलावले होते.

​दरम्यान, पैसे उसनवारीने घेणाऱ्यांनी त्यांच्यासमवेत आणखी पाच ते सहा जणांना आणले. त्यानंतर महिलेने त्यांना उसनवारीने दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यावर पैसे घेणाऱ्या व्यक्तींनी चिडून महिलेस ''कसले पैसे, तुझे पैसे देणार नाही. हात पाय तोडून टाकीन, आम्ही तुला ओळखत नाही. तुम्हाला कोठे गायब करु कळणार नाही'', अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर शिवीगाळ करीत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी फिर्यादी यांचे पती भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यावेळी टोळक्‍याने त्यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यानंतर कोयता हवेत फिरवून तेथील नागरिकांना धमकी देऊन दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Demanding borrowed money, the husband was beaten up and wife molested in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: