पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे आजी पोहोचल्या आपल्या घरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे हरविलेल्या आजींना त्यांच्या घरी सोडण्यात आले.

पुणे : पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे हरविलेल्या आजींना त्यांच्या घरी सोडण्यात आले. लायन्स क्लब दत्तवाडी या ठिकाणी कुसम चौरडीया  (वय ७७) या आजी हरवल्या होत्या. त्या रात्री ऩऊपासून घरातून गायब होत्या. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना लायन्स क्लब येथे आजी हरवल्याची माहीती दिली व फोटो पाठवून नातेवाईकांचा पोलिसांच्या वतीने शोध घ्यावा असे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पोलिस लायन्स क्लब या ठिकाणी आले. पोलिसांनी पत्ता विचारला असता आजी जनता वसाहत असा सांगत होत्या. दत्तवाडी कम्युनिटी पोलिसिंगचे काम पाहणारे पोलिस हवालदार श्रीकांत शिरोळे यांनी त्यानुसार व्हॅटसअँप ग्रुपवर त्यांची माहिती आणि फोटो पाठवून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, जर या महिला आपल्या ओळखीच्या असतील तर कृपया नातेवाईकांना माहिती द्या.

लवकर कुणाचाच प्रतिसाद आला नाही, अखेर दोन तासानंतर आजींचा सांभाळ करणारे अशोक महेशप्रसाद यादव, यांच्याशी संपर्क झाला आणि आजींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आजी फाळके फ्लॉट दत्तवाडी याठिकाणी राहत होत्या परंतू त्या पत्ता विसरलेल्या होत्या. पोलिसांच्या प्रयत्नामुळे आजी घरी पोहोचल्या. या सर्व कारवाईमध्ये पोलिस नाईक संतोष मेश्राम, जनाजी मंगले, तुळशीराम टेम्बुर्णे, सामाजिक कार्यकर्ते अमित येवले, शशिकांत काळे यांनी सहभाग नोंदवला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the police action Grandmother arrived at her house

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: