esakal | सिताफळांना पावसाचा तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

custerd apple.jpg

यंदा राज्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे सिताफळांच्या बागांवर विपरित परिणाम झाला आहे. सिताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडून त्यावर बुरशीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधी कोरोनाचा फटाका त्यात पुन्हा काळ्या डागांच्या बुरशी रोगामुळे सिताफळाच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सिताफळांना पावसाचा तडाखा

sakal_logo
By
प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : यंदा राज्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे सिताफळांच्या बागांवर विपरित परिणाम झाला आहे. सिताफळाच्या देठाजवळ काळे डाग पडून त्यावर बुरशीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधी कोरोनाचा फटाका त्यात पुन्हा काळ्या डागांच्या बुरशी रोगामुळे सिताफळाच्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मार्केट यार्डात सिताफळाची एकूण १० ते १५ टन आवक असून निम्मे सिताफळ काळया डागांच्या बुरशीमुळे खराब येत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतिकिलो 5 ते 60 रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ग्राहकांकडून सिताफळांची मागणी घटली आहे. कोरोनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जर नेहमीसारखी परिस्थिती असती तर सिताफळाला प्रतिकिलोला 10 ते 100 रुपये भाव मिळाला असता असे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू होताच घाऊक फळबाजारात सिताफळ दाखल होतात. ‘काळे डाग असल्याने विक्री होण्यास त्रास होत आहे. त्यामुळे  गेल्या वर्षींच्या तुलनेत २० ते २५ टक्के एवढाच दर मिळाला. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. या वर्षी झाडाला ३० ते ४० टक्के उत्पादन मिळाले आहे. बाहेरील राज्यात चांगल्या सिताफळाची विक्री होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. इतर प्रक्रिया उद्योगांकडून मागणी नसली तरी हातगाडी, फेरीवाले तसेच टेम्पोमधून माल विक्री करणार्‍यांकडून मागणीचे प्रमाण काहीसे वाढत आहे. घाऊक बाजारात फळांना भाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांकडून जागेवरच मालाची विक्री करण्यात येत आहे. परंतु उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने दरात घट झाली आहे, अशी खंत व्यापारी युवराज काची यांनी व्यक्त केली.

का मिळतोय कमी भाव 
- काळया डागांच्या बुरशीमुळे झालेले नुकसान
- कोरोनाच्या साथीमुळे आईस्क्रिम उद्योग, प्रक्रीया उद्योग, हॉटेल, मंगल कार्यालय बंद
- ७० टक्के माल हा पल्प उत्पादकांकडून तर ३० टक्के माल इतर ग्राहकांकडून खरेदी केला जातो
- इतर राज्यांमध्ये सिताफळ पाठवण्यासाठी रेल्वे, विमानसेवा व मर्यादा

येथे घेतले जाते उत्पादन 
सिताफळाचे उत्पादन पुरंदर तालुक्यासह सासवड, वाघापूर, गुऱ्होळी, वडकी, फुरसुंगी, शिरूर, नायगाव, पिसर्वे, काळेवाडी, सोनोरी, पिंपळे, बारामती, इंदापूर, शिरुर, जालना, सोलापूर या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

दहा किलो सिताफळातून ३३० ग्रॅम पल्प

दहा किलो सिताफळातून जवळपास ३३० ग्रॅम पल्प निघतो. या प्रकल्पाअंतर्गत 2 हजार टनाहून अधिक माल पल्प आणि पावडर स्वरुपात तयार करून ठेवण्यात येतो. साधारण 10 महिने हा माल टिकत असल्याने त्याचा मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो.
 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

प्रतिकूल वातावरणामुळे सिताफळाच्या देठाकडील भागात दव आणि पावसाचे पाणी साचून तेथे बुरशी निर्माण होते. त्या ठिकाणी सिताफळाच्या पेशी मृत होऊन काळे डाग पडू लागतात. त्यामुळे ग्राहक असे सिताफळ घेणे नापसंत करतात. त्यामुळे दर कमी मिळून नुकसान होते.
- नितीन कुंजीर, शेतकरी व व्यापारी मार्केट यार्ड

loading image
go to top