esakal | पिंपरीत कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी 
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सवावर पाणी

गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली. शहराच्या अंतर्गत भागासह पूरग्रस्त भागातील भाविकांनीही गणेशोत्सवाची तयारी केली. पुरामुळे परिसरातील रस्ते खड्डेमयच होते. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्ते पुन्हा चिखलमय झाले. सोमवारपासून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केलेले हलते व जिवंत देखाव्यांची कामे पूर्ण झाली होती. बुधवारपासून सर्व मंडळानी देखावे खुले केले. मात्र पावसामुळे फारसे भाविक घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. 

पिंपरीत कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता. 3) मध्यरात्रीपासून शहर परिसरात पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी दिवसभर सरींवर सरी बरसत होत्या. कधी जोरदार तर कधी हलक्‍या सरी कोसळत असल्याने सखल भागातील गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना कलेल्या परिसरात पाणी साचले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. नागरिकांनी देखावे व सजावट पाहण्यासाठी घराबाहेर पडणे टाळले. 

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात मुसळधार पाऊस झाला. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आला होता. अनेक कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. पूर ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले. गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली. शहराच्या अंतर्गत भागासह पूरग्रस्त भागातील भाविकांनीही गणेशोत्सवाची तयारी केली. पुरामुळे परिसरातील रस्ते खड्डेमयच होते. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे रस्ते पुन्हा चिखलमय झाले. सोमवारपासून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केलेले हलते व जिवंत देखाव्यांची कामे पूर्ण झाली होती. बुधवारपासून सर्व मंडळानी देखावे खुले केले. मात्र पावसामुळे फारसे भाविक घराबाहेर पडले नाहीत, त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. 

दक्षतेसाठी खबरदारी 
पवना धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरण भरले आहे. बुधवारी सकाळी साडेबारा हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू केला. त्यामुळे पवना नदीला पूर आला असून, गेले पंधरा दिवस पाणीपातळी कमी झालेला रावेत बंधारा ओसांडून वाहू लागला. नदीकाठच्या पिंपरीतील सुभाषनगर, संजय गांधीनगर, रमाबाई आंबेडकरनगर, सुभाषनगर भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. 

घाटांवर जीवरक्षक 
चिंचवडचा मोरया व पिंपरीतील झुलेलाल घाटासह थेरगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे निलख, सांगवी, दापोडी, फुगेवाडीतील गणेश विसर्जन घाटांच्या काही पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व घाटांवर जीवरक्षक व अग्निशामक दलाचे जवान तैनात आहेत. 

96422 : रावेत बंधारा 
96423 : पावसामुळे तारांबळ 
96424 : गणेश मंडळांच्या उत्साहावर पाणी 
 

loading image
go to top