
जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला, अग्निशामक दलाकडून रहिवाशांची सुटका
पुणे : शहरात शुक्रवारी रात्रभर सुरु राहिलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी शुक्रवार पेठेतील एका जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ पोचून सहा रहिवाशांची सुटका केली. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. तर शुक्रवारी रात्रभर शहरात पाऊस सुरू होता. दरम्यान, शुक्रवार पेठेतील नेहरु चौकात असलेला 80 वर्ष जुना असलेल्या कारंडे वाड्याचा काही भाग शनिवारी सकाळच्या सुमारास कोसळला.
वाड्याच्या भिंतीचा व जीन्याचा काही भाग कोसळल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणारे सहा रहिवासी अडकून पडले. या घटनेची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मदतकार्य सुरु केले. जवानांनी वाड्यातील कोसळलेल्या भिंतीच्या व जिन्यावळील मातीचा ढिगारा, दगड बाजुला करून शिडीच्या सहायाने रहिवासी उमा जन्नू (वय 55), गोपाळ जन्नू (वय 70), किरण जन्नू (वय 35), शोभा सातपुते (वय 64), गंगू बोबडे (वय 30), विकास बोबडे (वय 28) यांची सुटका केली.
Web Title: Due To Rain In Pune Old Castle Collapsed Residents Rescued By Firefighters Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..